Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने आदिवासींना वनवासी केले – राहुल गांधी

वाशिम/प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी वाशिम येथील आदिवासी बांधवांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर जोर

राहुल गांधी लोकसभेत पुन्हा परतले
महिला आरक्षणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ः राहुल गांधी
राहुल गांधींचा ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंतचा प्रवास

वाशिम/प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी वाशिम येथील आदिवासी बांधवांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून वाशिम जिल्ह्यात झालेल्या आदिवासी समाजाच्या सभेला संबोधित करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘आदिवासी हे देशाचे मालक आहेत, पण संघ व भाजपने त्यांना वनवासी बनवून टाकले आहे. त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत,’ असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ’भारत जोडो यात्रा’ मंगळवारी वाशिम जिल्ह्यात आहे. त्याच निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केले. आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या 24 व्या वर्षी शहीद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मूळ निवासी व मालक आहेत, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. ’देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे, पण संघ व भाजप तुम्हाला आदिवासी मानतच नाहीत, ते तुम्हाला वनवासी म्हणतात. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर ते आक्रमण करत आहेत. वनवासी संबोधून तुमचे हक्क हिरावून घेतले जात असल्याची टीका केली.

COMMENTS