Homeताज्या बातम्या

नाशिकमध्ये देवचंद्र फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय 'महाराष्ट्र ग

नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण; एचआरसह सहा जणांना कोठडी
दिंडोरीत ACB ची मोठी कारवाई! वेतनश्रेणीच्या बिलासाठी लाचेची मागणी!
१३७ वर्षांचा इतिहास असलेल्या कर्जत उपकारागृहाला अखेर कुलूप !२७ आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी; पोलीस, न्यायालयासमोरील अडचणी वाढतील?

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळा नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘देवचंद्र फाउंडेशन’च्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकमधील कॉलेज रोड येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन सौ. देवयानी आहेर, जयश्रीताई बस्ते आणि गणेश जगदाळे यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी, आडगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर आडगावकर, मिलिंद तारे, मास्टर झेन, डॉ. आशाताई पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हर्षलाताई भोसले, सागर निकाळे, मुजाहीद मोहिनोद्दीन फारुकी अशर्फी, शाम जाधव, संदीप काकड, किरणताई शिंपी, विकास घाटोळ यांच्यासह अनेक मान्यवरांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजहिताच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार सोहळे प्रेरणादायी ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS