शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकला ; महाविकास आघाडी ९९ वर बाद

Homeताज्या बातम्या

शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकला ; महाविकास आघाडी ९९ वर बाद

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव प्रचंड मताधिक्याने जिंकला असून आघाडीच्या अनेक आमदारांनी दांडी मारल्याचे

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला
राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
चंद्रपूरात भूकंप सदृश्य धक्के !

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव प्रचंड मताधिक्याने जिंकला असून आघाडीच्या अनेक आमदारांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ आज अजून घटल्याचे दिसून आले, महाविकास आघाडीच्या बाजूने विश्वासमत प्रस्तावाविरोधात केवळ ९९ आमदारांनी मतदान केलं. तर सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.
काल झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. या मतदानामध्ये मविआमधील अनेक आमदार अनुपस्थित असल्याचे दिसून आले होते.

COMMENTS