Homeताज्या बातम्या

चंद्रपूरात भूकंप सदृश्य धक्के !

 चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर शहराचा बाबुपेठ परिसरात भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याची अफवा पसरली. मात्र हे धक्के भूकंपाचे नसल्याचे अभ्यासकांनी सा

गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलीच्या दागिन्याची चोरी 
अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावरील शोकप्रस्ताव वाचनावेळी झाल्या होत्या गंभीर चुका
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; 30 दिवसांत हजर न झाल्यास मालमत्ता होणार जप्त

 चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर शहराचा बाबुपेठ परिसरात भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याची अफवा पसरली. मात्र हे धक्के भूकंपाचे नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. बाबुपेठ, लालपेठ आणि नांदगावपेठ या परिसरात धक्के जाणविले. या परिसरात खुल्या  भूमिगत कोळसा खानी आहेत. या खाणीत स्पोट केला असावा किंवा भूखलनाची घटना घडली असावी, त्यामुळ हे धक्के जाणवले, अशी शक्यता अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी वर्तवली आहे.  चंद्रपूर शहरातील बाबुपेठ, लालपेठ आणि नांदगावपेठ या परिसरात धक्के जाणविले होते. त्यामुळ या परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे धक्के भूकंपाचे होते काय ? याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. हा धक्का एक मॅग्नेट्यूड पेक्षा जास्त क्षमतेचा दर्शविलेला होता. तो जमिनीपासून दहा किलोमीटरच्या खोलीत घडून आला, असे काहींनी म्हटलं. या परिसरात यापूर्वीही असे धक्के जाणवल्या गेले आहेत. कोळसा खाणीत ब्लास्ट केल्या जात. या ब्लास्ट मुळे अनेक घरांना तडे गेलेले आहेत. घुगुस येतील अख्ख घर जमिनीत गेल होत. या घटनेला भूमिगत खानी जबाबदार असल्याचही त्यावेळी बोललं गेलं. भूमिगत कोळसा खाणीत कोळशाचा उपसा केल्यानंतर तिथं रेती भरणं गरजेचं होतं. मात्र रेती भरण्याकडे वेकोलीच दुर्लक्ष झाल. आणि घुगुसची घटना घडली. अशा घटना यापुढेही होऊ शकतात. यासाठी प्रशासनानं कोळसा खाणी संदर्भात ठोस धरण फुलंबने आता गरजेचे झाले आहे, असे आता बोलले जात आहे.

COMMENTS