Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संघाचे प्रतिकूल परिस्थितीमधील काम हेच आजच्या यशाचे रहस्य : सुनील देवधर; कर्जतमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात

कर्जत : संघाच्या प्रचाराकांनी व संघ स्वयंसेवक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशात काम केले आणि त्यांच्या या कामामुळेच आज खऱ्या अर्थाने मोठे यश आपण सर्व मिळालेले पाहत आहोत. मात्र एवढ्यावर न थांबता या पुढील काळामध्ये देखील अखंडपणे या देशाच्या एकतेसाठी संघ स्वयंसेवक प्रचारक आणि सर्व नागरिकांना काम करावे लागेल असे प्रतिपादन सुनील देवधर यांनी कर्जत येथे विराट हिंदू संमेलनामध्ये बोलताना प्रतिपादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. माय होम इंडिया याचे प्रमुख सुनील देवधर तसेच केडगाव येथील शंकर महाराज मठाचे प्रमुख गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्जत येथील बाजार तळ येथे हे संमेलन पार पडले यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होत्या. “नावासाठी नव्हे, तर समाजासाठी काम करा,” असा प्रेरणादायी संदेश देत, आपल्या भाषणात देवधर यांनी संघाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संघाच्या प्रचारकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम केले असून अनेकदा विरोध आणि मारहाणीलाही सामोरे जावे लागले. मात्र संघटनशक्तीमुळेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे ते म्हणाले.    देशाच्या फाळणीच्या काळातील भीषण परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी समाज एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम संघ सेवन सेवकांनी केले . पुढील काळात संघटन बळकट करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या संघटनांची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी अशोक दादा जाधव (शंकर महाराज मठ) यांनी हिंदुत्वाविषयी अत्यंत प्रखर आणि प्रभावी विचार मांडले. हिंदुत्व ही केवळ धार्मिक ओळख नसून ती एक जीवनपद्धती आणि संस्कारांची परंपरा आहे, असे सांगत त्यांनी समाजाने स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले.   समाजात समरसता आणि समानतेचा संदेश देत “हिंदू म्हणून एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे,” असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमात पद्यगायन आशिष निलंगे व कचरे  यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऋतुजा कुलथे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऍड. आकाश हळणावर यांनी मानले.

संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी  
शेवगावमध्ये पाच हजार घरकुले रद्द होण्याची शक्यता; ३१ मार्चपर्यंत बांधकाम सुरू न केल्यास कारवाई; पंचायत समितीचा इशारा
रयत बँकेकडून गुणवंत पाल्यांचा सत्कार
oplus_1048576

कर्जत : संघाच्या प्रचाराकांनी व संघ स्वयंसेवक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशात काम केले आणि त्यांच्या या कामामुळेच आज खऱ्या अर्थाने मोठे यश आपण सर्व मिळालेले पाहत आहोत. मात्र एवढ्यावर न थांबता या पुढील काळामध्ये देखील अखंडपणे या देशाच्या एकतेसाठी संघ स्वयंसेवक प्रचारक आणि सर्व नागरिकांना काम करावे लागेल असे प्रतिपादन सुनील देवधर यांनी कर्जत येथे विराट हिंदू संमेलनामध्ये बोलताना प्रतिपादन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. माय होम इंडिया याचे प्रमुख सुनील देवधर तसेच केडगाव येथील शंकर महाराज मठाचे प्रमुख गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्जत येथील बाजार तळ येथे हे संमेलन पार पडले यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होत्या.

“नावासाठी नव्हे, तर समाजासाठी काम करा,” असा प्रेरणादायी संदेश देत, आपल्या भाषणात देवधर यांनी संघाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संघाच्या प्रचारकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम केले असून अनेकदा विरोध आणि मारहाणीलाही सामोरे जावे लागले. मात्र संघटनशक्तीमुळेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे ते म्हणाले.

   देशाच्या फाळणीच्या काळातील भीषण परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी समाज एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम संघ सेवन सेवकांनी केले . पुढील काळात संघटन बळकट करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या संघटनांची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी अशोक दादा जाधव (शंकर महाराज मठ) यांनी हिंदुत्वाविषयी अत्यंत प्रखर आणि प्रभावी विचार मांडले. हिंदुत्व ही केवळ धार्मिक ओळख नसून ती एक जीवनपद्धती आणि संस्कारांची परंपरा आहे, असे सांगत त्यांनी समाजाने स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले.   समाजात समरसता आणि समानतेचा संदेश देत “हिंदू म्हणून एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे,” असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमात पद्यगायन आशिष निलंगे व कचरे  यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऋतुजा कुलथे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऍड. आकाश हळणावर यांनी मानले.

COMMENTS