Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरजूवंतांना मिळणार घरकुलाचा लाभ : आ. खताळ

।संगमनेर : संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल.ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजूवंत लाभार्थ्यांना घरकुल

सोलापूरच्या आयटीआयमध्ये धार्मिक छळविद्यार्थिनींच्या छळाच्या तक्रारींच्या चौकशीसाठी विशेष पथक दाखल
जळगाव एमआयडीसीत अग्नितांडव! सिलिंडर स्फोटाने भीषण आग; तीन कंपन्या खाक, सुदैवाने जीव वाचले!
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; सोलापूरच्या माढा तालुक्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन
PHOTO-2025-02-23-16-04-00.jpg

।संगमनेर : संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल.ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजूवंत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल असे, प्रतिपादन आ अमोल खताळ यांनी केले

 संगमनेर पंचायत समिती सभागृहात  तालुक्यातील ७ हजार १४५ लाभार्थ्यांना  घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आले असल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आ. अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप, गुंजाळवाडीचे भाजप नेते रोहिदास गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभाग उपअभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषीअधिकारी वाळीबा उघडे व रामराव कडलग, विस्तार अधिकारी  मदन शेवाळे, राजेंद्र कासार,  काशिनाथ सरोदे,  सदानंद डोखे, श्रीमती भाग्यश्री शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

      आ. खताळ म्हणाले की, या देशातील सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. परंतु यापूर्वीच्या काळात येथून मागे मंजूर झालेल्या घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु आता येथून पुढील काळात घरकुले तयार करताना कुठली अडचण येणार नाही. घरकुलाचे बांधकाम करताना वाळू मिळण्यास लाभार्थींना अनेक अडचणी आल्या होत्या, परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी सूचना आपण प्रांतांधिकारी आणि तहसीलदार असच देत असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे  प्रस्ताविक व स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी केले.तर सूत्रसंचालन कक्ष अधिकारी राजेश तिटमे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS