Homeताज्या बातम्या

आषाढीनिमित्त पिंपळनेरला यात्रेचे स्वरूप

Ahilyanagar News प्रतिनिधी / निघोज -प्रती पंढरपुर म्हणजे श्री क्षेत्र पिंपळनेर येथे श्री संत निळोबाराय महाराज दर्शनासाठी भाविकांची खुप गर्दी झाल

शरीरसौष्ठव स्पर्धेत रॉबी मैथीई, सुनंदा साळुंखे यांनी पटकावले पारितोषिक
मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

Ahilyanagar News प्रतिनिधी / निघोज –
प्रती पंढरपुर म्हणजे श्री क्षेत्र पिंपळनेर येथे श्री संत निळोबाराय महाराज दर्शनासाठी भाविकांची खुप गर्दी झाली जणु पिंपळनेरला आषाढी एकादशीनिमित्त यात्रेचे स्वरूपच प्राप्त झाले . सकाळी पहाटे पासुनच भाविकांची दर्शन रांगा लागल्या होत्या .

वारकरी भक्तांना जशी पंढरीची ओढ लागलेली असते त्याचप्रमाणे पिंपळनेर येथे संत निळोबाराय दर्शनासाठी राज्यातून वारकरी मोठया संख्येने येत असतात . विविध गावांतून अनेक खुप मोठया दिंडया व संत निळोबाराय विद्यालय पिंपळनेर , जि प प्राथमिक शाळा रासकर वस्ती, जि प प्राथमिक शाळा पिंपळनेर डि बी एम इंग्लिश मेडीअम स्कूल राळेगणसिध्दी आदी शाळेच्या विद्यार्थ्याची बालदिंडी मोठया उत्साहात निघून संत निळोबारायांच्या प्रांगणात अभंग , हरीपाठ ., गौळणी तर कुणी फुगडया खेळून आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी गावातील ग्रामस्थांनी भाविकांसाठी खिचडी व फराळ / केळी वाटपही ठेवली होती . यावेळी दर्शन व्यवस्थित होण्यासाठी संत निळोबाराय संस्थान , सेवा मंडळ ग्रामपंचायत आणि प्रशासन यांनी खुप सहकार्य केले.

COMMENTS