Homeताज्या बातम्यादेश

इस्त्रोचा आवाज हरपला; काऊंटडाऊन करणाऱ्या शास्त्रज्ञ वलारमती यांचे निधन

तामिळनाडू प्रतिनिधी - एकीकडे संपूर्ण देश भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रत्येक यशाचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे एक दुःखद बातमी

गॅस गळतीमुळे सिलेंडर चा स्फोट .
आजचे राशीचक्र बुधवार, १३ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
युवा नेते प्रतीक पाटील यांच्या लग्नाची जय्यत तयारी

तामिळनाडू प्रतिनिधी – एकीकडे संपूर्ण देश भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रत्येक यशाचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे एक दुःखद बातमी समोर आली आहे. चांद्रयान-3 मोहिमेत मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या वैज्ञानिक वलरमथी यांचं निधन झालं आहे. वलरमथी यांना शनिवारी सायंकाळी रात्री हृदयविकाराचा तीव झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इस्रोच्या सर्व प्रक्षेपणांच्या काउंटडाऊन दरम्यानचा आवाज वलरमथी यांचाच होता. इस्त्रोने श्रीहरीकोटा चांद्रयान-3 मोहिमेचे उड्डाण भरले होते. या मोहिमेवेळी जे काउंटडाउन करण्यात आलं होतं. त्याचा आवाज वालारामथी यांचा होता, हा आवाज संपूर्ण देशाने ऐकला होता. मात्र वलरमथी यांचं हे शेवटचं काउंटडाऊन ठरलं. वृत्तानुसार, तमिळनाडूतील अरियालुर येथे वलारमथी यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. वलरमथी यांच्या निधनाबद्दल इस्त्रोचे वैज्ञानिक डॉक्टर पीव्ही वेंकटकृष्ण यांनी दुखः व्यक्त केलं आहे. त्यांनी श्रीहरीकोट्टा येथे इस्त्रोच्या भविष्यातील मिशन्सची उलटी गिनतीसाठी वलारमधी मॅडम यांचा आवाज ऐकू येणार नाही, असं म्हणत दु:ख व्यक्त केलं आहे.

COMMENTS