श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण खालसा चांडगाव नकाशावरील गाव जोडणी रस्ता मोजणी यशस्वी पूर्ण .

Homeताज्या बातम्याअहमदनगर

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण खालसा चांडगाव नकाशावरील गाव जोडणी रस्ता मोजणी यशस्वी पूर्ण .

श्रीगोंदा /शुक्रवार, 27 जून 2025 रोजी भिंगाण खालसा (ता. श्रीगोंदा) येथील वर्षानुवर्षे बंद असलेल्या नकाशावरील रस्त्याची मोजणी कर्तव्यदक्ष प्रभारी तहसी

आईच झाली वैरीण ! पाच महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या
आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला ः आरिफ शेख
अहमदनगरमध्ये “भीम पहाट” कार्यक्रमाचे आयोजन

श्रीगोंदा /
शुक्रवार, 27 जून 2025 रोजी भिंगाण खालसा (ता. श्रीगोंदा) येथील वर्षानुवर्षे बंद असलेल्या नकाशावरील रस्त्याची मोजणी कर्तव्यदक्ष प्रभारी तहसीलदार प्रवीण मगदूम व भूमी अभिलेख उपअधीक्षक सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेव पाटील यांच्या कडून यशस्वी पूर्ण करण्यात आली.

लवकरच खुणा दाखवून शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी रस्ता खुला होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संतोष शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने शासनाच्या व शिवपानंद चळवळीच्या या अभियानाला ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.

शिवपानंद शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व श्रीगोंदा कृती समिती सदस्य अ‍ॅड. गोरख कडूस पाटील यांनी मोजणी दरम्यान शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले व सर्व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल चळवळीच्या वतीने आभार मानले.

शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष व एकजूट हेच या यशामागचे खर श्रेय आहे हिच आमची ताकत आहे असे दादासाहेब जंगले पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

यावेळी तलाठी निकाळजे मॅडम, संतोष शिंदे , ग्रामपंचायत शिपाई, रस्त्यालगतचे शेतकरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व मोजणीस सहकार्य केले.

COMMENTS