Homeताज्या बातम्यामनोरंजन

’द कश्मीर फाइल्स’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः’द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार स

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांची गोळ्या झाडून आत्महत्या ; वरिष्ठांविरोधात आरोप
इंदापूरमध्ये शिकाऊ विमान कोसळले, महिला पायलट जखमी
रघुराम राजन : भांडवलदारांचे हस्तक अर्थतज्ज्ञ !

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः’द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला असून या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या ’द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.  ’द कश्मीर फाइल्स’ या बहुचर्चित सिनेमाला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.

विवेक अग्निहोत्रींनी ट्वीट करत ही माहिती दिली असून, दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात ’द कश्मीर फाइल्स’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर नाव कोरले आहे. हा पुरस्कार काश्मिरी पंडित आणि आम्हाला आशीर्वाद दिलेल्या तुम्हा भारतीयांना समर्पित करतो.  विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ’द कश्मीर फाइल्स’ या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. पण तरीही वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्ल्वी जोशी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमत काश्मीर खोर्‍यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करण्यात आले होते. भारतात या सिनेमाने 252.90 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमाने 340.92 कोटींची कमाई केली आहे.  दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात ’द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ’आरआरआर’ या सिनेमाला ’फिल्म ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा आणि रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो.

COMMENTS