Homeताज्या बातम्या

जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्याप्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मच

आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ
जागतिक इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन!
भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड!गायकवाड कुटुंबियांना दिलासा ; मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता
महाराष्ट्र : चीनी एमएसपी में बढ़ोतरी को लेकर केंद्र सरकार से चर्चा की जाएगी, मुख्यमंत्री फडणवीस का आश्वासन - ChiniMandi


मुंबई : जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर नियमानुसार ठोस कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.
विधानसभेत सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचाच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईने काढला. कोणताही अंतिम निष्कर्ष किंवा वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्या महिलेच्या आई-वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचे समोर आले आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई-वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान, सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचे वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे संबंधित गुन्हे शाखेतील सर्व पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. निलंबन ही केवळ प्राथमिक कारवाई असून, ज्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे सिद्ध होईल, अशा अधिकार्‍यांवर विहित प्रक्रिया पूर्ण करून सेवेतून निष्कासनाची कारवाईही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS