Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय फलदांजांची पुन्हा उडाली दाणादाण

पुणे : भारतीय फलंदाजांची हाराकिरी पुणे कसोटीतही दिसून आली. पहिल्या बंगळुरू कसोटीत भारत सर्वबाद 46 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघावर मोठी नामुष

दीपक सोनवणे गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम
चंद्रभागा पोदार लर्न स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराशंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास; निरोगी जीवनशैलीचा दिला संदेश
खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक

पुणे : भारतीय फलंदाजांची हाराकिरी पुणे कसोटीतही दिसून आली. पहिल्या बंगळुरू कसोटीत भारत सर्वबाद 46 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यानंतरही भारतीय संघ धडा घेण्यास तयार नसल्याचे पुणे कसोटीत देखील दिसून आले. या कसोटीत मिचेल सँटरनच्या 7 विकेट्सच्या जोरावर किवी संघाने भारताला 156 धावांवर ऑल आऊट केले. अशारितीने भारतीय फलंदाज पुन्हा एकदा निराशाजनक फलंदाजी करताना दिसले.
फिरकीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फिरकीपटूने आपल्या फिरकीची जादू दाखवली. पहिल्या बंगळुरू कसोटीत टीम इंडिया 46 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे भारताला त्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

COMMENTS