द्घाटनाआधीच उड्डाणपूल खचला

Homeताज्या बातम्या

द्घाटनाआधीच उड्डाणपूल खचला

नागपूर ः विदर्भातील नागपूर हा जिल्हा म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे य

पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लांबणीवरमाजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 10 जणांवर आरोप
जालन्यात काँगे्रसच्या 7 नगरसेवकांचे निलंबन; पक्षादेश डावलल्यामुळे काँगे्रस प्रदेशाध्यक्षांकडून कारवाई
‘पीएम-राहत’ योजना प्रभावीपणे राबवा : मंत्री आबिटकर; अपघातग्रस्तांना तात्काळ दीड लाखापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

नागपूर ः विदर्भातील नागपूर हा जिल्हा म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा. याच जिल्ह्यात उद्घाटनाआधीच उड्डाणपूल खचल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


उड्डाणपूल बांधून तयार झाला असून त्याचे उद्घाटन करण्यास अवधी असतांनाच ही घटना घडली.कामठी ते न्यू कामठीला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. जोरदार पावसामुळे मोठे मोठे खड्डे देखील पडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने याचे उद्घाटन बाकी असल्याने वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

सोशल मीडियावर रस्त्याला पडलेले खड्डे व खचलेल्या भागाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत नागपूर शहराचा विकास होत असला तरी या कामांच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उद्घाटन होण्यापूर्वीच कामठी ते न्यू कामठी अशा या उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडल्याचे तसेच एका ठिकाणी रस्ता खचल्याचे समोर आले आहे.

हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. हा सार्वजनिक निधीचा अपव्यय नव्हे तर सर्व सामान्य लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहेत. या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता असावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS