Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतग उडवणे बेतले जीवावर ; 12 वर्षीय मुलीचा विहीरीत पडून मृत्यू

देवळाली प्रवरा : मकरसंक्रात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे पंतग उडवण्याचा आनंद अनेक मुलं-मुली घेतांना दिसून येत आहे. मात्र पंतग उड

अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
शाश्‍वत विकासासाठी बायोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय ः मोम्ना हेजमदी
दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

देवळाली प्रवरा : मकरसंक्रात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे पंतग उडवण्याचा आनंद अनेक मुलं-मुली घेतांना दिसून येत आहे. मात्र पंतग उडवणे जीवावर बेतल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली असून, यात या मुलीचा मृत्यू झाला आहे. मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एक 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहीरीत पडली. आणि तीचा पाण्यात बुडून दुदैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी 10 जानेवारी रोजी सकाळी घडली.
नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसरात राहत आहे. मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यापैकी बिनीता बिष्णू थापा ही 12 वर्षाची मोठी मुलगी असून ती पाचवी च्या वर्गात शिक्षण घेत होती. सुमारे पाच महिन्यापूर्वी ती नेपाळ येथून आली होती. मुलीने हट्ट केल्यामुळे तीचे वडील बिष्णू थापा यांनी तीला पतंग आणून दिली. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजे दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती. पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहीरीत पडली. आणि पाण्यात बुडू लागली. तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहीरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहीरीतून बाहेर काढण्यात आले. सचिन धसाळ व सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकिय अधिकार्‍यांनी तीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. यावेळी मयत बिनीता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS