Homeताज्या बातम्यादेश

मतदार यादीतून हटवली 1.66 कोटी नावे

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत

‘रिफायनरी’ विरोध पेटला
अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श वर्ल्ड कप मधून अनिश्चित काळासाठी बाहेर
देशात यंदा 96 टक्के पाऊस होणार

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असतांना दुसरीकडे निवडणूक आयोगाने 1 कोटी 66 लाखापेक्षा अधिक नावे मतदार यादीतून हटवली आहेत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून 12 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने 1 कोटी 66 लाखापेक्षा अधिक मतदार यादीतून हटवली तर, 2 कोटी 68 नवीन नावे मतदार यादीत यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या मतदात्यांची संख्या आता 97 कोटीवर पोहोचली आहे. आसाम, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगाना या 6 राज्यांना वगळून मतदात्यांचा फेरआढावा घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली. संविधान बचाओ ट्रस्टने मतदार याद्यांमधील बनावट नावे हटवून त्याची माहिती सार्वजनिक करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावर निवडणूक आयोगाला खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान निवडणूक आयोगान न्यायालयासमोर मतदारांची आकडेवारी सादर करताना, मृत्यू झालेल्या व्यक्तींची आणि दोन वेळा समाविष्ट झालेली नावे मतदार यादीतून हटवण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावर 12 फेब्रवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

COMMENTS