Homeताज्या बातम्यादेश

सीबीआयने थलापती विजयला बजावले समन्स

नवी दिल्ली ः करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने अभिनेता थलापती विजय यांना नोटीस पाठवली असून 12 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. थलापती

मांत्रिकांच्या माध्यमातून मेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यू कमी होईल-आरोग्य विभागाचा दावा
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ : मूल्यमापन समितीवर पत्रकार गोविंद टेकाळे यांची निवड
 येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल – कालीचरण महाराज

नवी दिल्ली ः करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने अभिनेता थलापती विजय यांना नोटीस पाठवली असून 12 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. थलापती विजय यांना 12 जानेवारी रोजी दिल्लीत असलेल्या सीबीआय मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे.
27 सप्टेंबर 2025 रोजी तमिळनाडूच्या करूर येथे विजय यांच्या पक्ष तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) ची एक जाहीर सभा झाली होती. या सभेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली होती. माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत किमान 41 जणांचा मृत्यू झाला असून 110 हून अधिक लोक जखमी झाले होते. करूर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरच्या दुसर्‍याच दिवशी विजय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली होती. याआधी अनेकांनी विजय यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि करूर चेंगराचेंगरीसाठी त्यांनाच जबाबदार धरले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.

COMMENTS