Homeताज्या बातम्या

बैलपोळा फोडण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी.

दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी याप्रकरणी पोलिसांनी २० ते २५ जणांचा घेतले ताब्यात

परभणी प्रतिनिधी - परभणी  जिल्ह्यात बैलपोळ्याच्या सण मोठ्या उत्सवात साजरा केला. अशात जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाला गालबोट लागलं. बैलपोळा स

मिरजेत डिजिटल अरेस्टची भीती घालून सव्वा कोटींना गंडा
पेट्रोलपंपांवरील क्यूआर कोड घोटाळा उघड; नांदेड सायबर पोलिसांची धडक कारवाई; 3 आरोपी जेरबंद, 9.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार : मंत्री नारायण राणे

परभणी प्रतिनिधी – परभणी  जिल्ह्यात बैलपोळ्याच्या सण मोठ्या उत्सवात साजरा केला. अशात जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाला गालबोट लागलं. बैलपोळा साजरा करण्यावरून जिंतूर तालुक्यातील चांदज गावात दोन गटांमध्ये वाद  झाला. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. दोन गटात झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. बैलपोळा फोडण्यावरून ही हाणामारी झाली असून दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी पोलीस पथकासह तातडीने चांदज गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २० ते २५ जणांचा ताब्यातही घेतलं आहे.

COMMENTS