Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.क्षीरसागरांच्या एकनिष्ठेला पक्षाकडून दाद !

जिल्हाध्यक्ष पदाची नवी जबाबदारी

बीड प्रतिनिधी - सध्याच्या राजकारणात पक्षाबद्दल निष्ठा आणि पक्षाचे तत्व, विचारधारा वहन करण्याचे आणि वाढविण्याचे सामर्थ्य कार्यकर्त्यांमध्ये लोप पा

पुस्तकांच्या विश्वात मुले रमली
पोलिस अधिकार्‍याकडून पत्रकारास असभ्य भाषा
पोलिस ठाणे व कर्मचार्‍यांच्या निवास स्थानासाठी निधी द्या

बीड प्रतिनिधी – सध्याच्या राजकारणात पक्षाबद्दल निष्ठा आणि पक्षाचे तत्व, विचारधारा वहन करण्याचे आणि वाढविण्याचे सामर्थ्य कार्यकर्त्यांमध्ये लोप पावत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. परंतु काही कार्यकर्ते असे काही निष्ठावंत आजही आहेत की, आपल्या पक्षावर, संघटनेवर कितीही पडता काळ आला तरी आपण डगमगायचं नाही. ठामपणे आपल्या पक्षासोबत रहायचं, मग भले काही होओ, आपण मात्र एकनिष्ठ रहायचं. अशाच एकनिष्ठतेच निरूपण बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. जिल्हाभरातील सगळे दिग्गज सोडून जात असताना, मोठे-मोठे प्रलोभने मिळत असताना देखील आ.संदीप क्षीरसागर न डगमगता स्वपक्षात राहीले आणि आपली निष्ठा निभावली.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षामध्ये उभी फुट पडली. परंतु आ.संदीप क्षीरसागर कोणत्याच अमिषाला व दबावाला बळी न पडता पक्षाशी व खा.शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. याच एकनिष्ठतेला पक्षाकडून दाद दिली गेली व आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा संपूर्ण कारभार आता आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे आला असून जिल्हाभरात पक्ष बळकट करणे आणि वाढविण्याचे मोठे काम आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

निष्ठा हीच माझ्यासाठी प्रतिष्ठा- आ.संदीप क्षीरसागर माझ्यासाठी निष्ठा म्हणजेच प्रतिष्ठा आहे. माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर जिल्हाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब, कार्याध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब यांचे आभार मानतो. मी, शिवराय-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कार्यतत्पर राहील. बीड जिल्हा हा सदैव मा.शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.  अशी ग्वाही आ.संदीप क्षीरसागर यांनी दिली. आ.संदीप क्षीरसागरांचा राष्ट्रवादीतील प्रवास 5 वर्षे पंचायत समिती बीड सभापती, 2 वर्षे जिल्हा परिषद सदस्य, 5 वर्षे जिल्हा परिषद सभापती, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काकू-नाना आघाडीचे गठन करून काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवार , 2023 पक्षाशी एकनिष्ठ राहून मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहून बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी बीडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष आ.संदीप क्षीरसागर यांच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवडीची बातमी कळताच बीड शहरात राष्ट्रवादी-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

COMMENTS