Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके

सातारा / प्रतिनिधी : सातारा विभागीय आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे झाल्य

पहिल्या पावसातच फलटण बस स्थानक बनले पाण्याचे तळे
पाच लाखांची लाच घेताना ’ग्रामसेवक’ लाचलुचपतच्या जाळ्यात
इस्लामपूर येथे एका व्यासपीठावर 35 जुळी; मुक्तांगण प्ले स्कूलचा अनोखा उपक्रम

सातारा / प्रतिनिधी : सातारा विभागीय आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे झाल्या. या स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण आणि 3 कांस्य पदके मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. या स्पर्धेत यश जाधव, कु. मयुरी जाधव यांनी सुवर्णपदक मिळविले. तसेच कु. गीता कणसे, कु. सुश्मिता उबाळे, चैतन्य सावंत या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळविले. त्यांची शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर आणि सर्व उपप्राचार्य, प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रमसिंह ननावरे आणि प्रा. अभिषेक कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS