Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

विनयभंग, दरोडे, मारहाण प्रकरणाच्या गुन्ह्यात वाढ

जामखेड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतांना दिसून येत असून, दररोज होणारे विनयभंग

चालकाला चक्कर आली व जीप खड्ड्यात गेली ; अपघातात दोन महिलासह तीन जखमी
समृद्धीवरील अपघातात चौघांचा मृत्यू
कृष्णानंद महाराज यांचे कार्य देवस्वरूपी ः मेजर सैंदोरे

जामखेड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतांना दिसून येत असून, दररोज होणारे विनयभंग, मारामार्‍या, दरोडे, चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शहरासह तालुक्यात पोलिस प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचा सवाल नागरिकांकडूनउपस्थित करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांचे पोलिस स्टेशनचे गुन्हे दाखल रजिस्टर पाहिले असता, एकही दिवस सुना गेला नाही. चोर्‍या, विनयभंग, दरोडे, जबर हाणामार्‍या, जीवे मारण्याचा प्रयत्न अशी गंभीर गुन्हे रोजच्या रोज दाखल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक, कारवाई, शिक्षा हे नगण्यच दिसुन येत आहे. 20 ऑगस्टला सांगवी गावात शेतीच्या वादावरून जबर मारहाण झाली जीवे मारण्याचा प्रयत्नांचा परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.19 ऑगस्टला शहरातील म्हेत्रे वस्ती येथील एका कुटुंबात भांडणे होऊन 326 या गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.  22 ऑगस्टला फक्राबाद येथे वागणुकीचा व चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला गंभीर जखमी केले जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल. 22 रोजीच शहरातील कुंभारतळ येथे दहावीत शिकणार्‍या युवकावर हल्ला झाला 326 या गंभीर कलमानुसार गून्हा दाखल. 24 ऑगस्टला विरोधात साक्ष देण्याच्या कारणावरून भर दुपारी कोर्टाच्या आवारातच बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांना जबर हाणामारी झाली. याच दिवशी रोजी बाजार समितीच्या परिसरात शहरातील दोन गटातील तरूणांमध्ये जबर मारहाण झाली. अनेक ठिकाणी याच आठ दिवसांत अनेक गंभीर घटना घडल्या मात्र संबंधितांनी पोलिस ठाण्यात दाखल केले नाहीत. यावरून पोलिस दबावाखाली काम करत आहेत का? गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांना कायद्याची भीती राहीली नाही का? असाच प्रश्‍न आता उपस्थित होतांना दिसून येत आहे. दोन्ही आमदारांना तालूक्यातील वाढत्या गून्हेगारीचे काहीही घेणे देणे दिसत नाही. कोणीही आपल्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला भांडण करू नका. कायदा हातात घेऊ नका. असे आवाहन करतांना दिसत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या भांडणाला राजकीय स्वरूप दिले जात आहे त्यामुळे पोलिसांनी काम करतांना अप्रत्यक्ष दबाव येत आहे. म्हणून गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई होत नाही. सध्या गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत तालुक्यातील वातावरण अस्थिर दिसत आहे. दोन्ही आमदारांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पोलिस निरीक्षक पाटील यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान – तालुक्यातील वाढती गुन्हेगारी राजकीय नेत्यांना आवरता येत नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बिनधास्त वावर वाढला असून सामान्य माणूस भीतीच्या वातावरणात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामाच्या पध्दतीची नकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे. देशात अग्रगण्य असलेल्या मूबंई पोलीसमध्ये अनूभव घेतलेले पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेडला धाक व शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई व कडक शिस्तीचा अवलंब करण्याची गरज आहे. पोलिसांनी काही लोकांच्या मैत्रीतुन बाहेर पडत कर्तव्यावर लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य माणसाच्या संरक्षणाला प्राधान्य देऊन तालुक्यातील निर्ढावलेल्या गुन्हेगारांवर निपक्षपातीपणे कठोर कारवाई करून विस्कळीत झालेली कायदा व सुव्यवस्था सरळ करावी अशी अपेक्षा जनतेच्या चर्चेतून पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्याकडुन केली जात आहे

COMMENTS