Homeमहाराष्ट्र

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

निरीक्षक नतिशा माथूर यांची पाहणी, पारदर्शक व निर्भय निवडणुकीचे निर्देशनांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व

नांदेड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनाच सक्षम
मुख्यत्र्यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल : माजी खा. विखे
लोकशाहीचा आज उत्सव !

निरीक्षक नतिशा माथूर यांची पाहणी, पारदर्शक व निर्भय निवडणुकीचे निर्देश
नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक प्रक्रियेबाबत काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश निवडणूक निरीक्षकांनी दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगामार्फत मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नतिशा माथूर (भा.प्रा.से.) यांची, तर विभागीय आयुक्तांकडून अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार, दि. 31 डिसेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर यांनी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींचा तात्काळ निपटारा, अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेळेत नियुक्त्या व प्रशिक्षण, तसेच रॅली, सभा व वाहन परवानग्यांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप न देता तटस्थपणे काम करण्याचे निर्देश दिले. पोलीस, उत्पादन शुल्क व इतर विभागांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार नांदेड वाघाळा शहर महापालिका क्षेत्रात एकूण 600 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून, या केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे व दिव्यांगांसाठी रॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. बैठकीनंतर निवडणूक निरीक्षकांनी सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची तसेच शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली. इव्हीएम सिलिंगसह विविध बाबींचा आढावा घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नियोजनबद्ध व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

COMMENTS