Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौ. के.एस.के. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा 21वा नाट्य महोत्सव 24 एप्रिलला

बीड : येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा 21वा नाट्य महोत्सव दिनांक 2

महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली : डॉ. प्रमोद गायकेसौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी
पुस्तक वाचनाने माणूस घडतो-प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागरसौ. के.एस.के. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 18 तास वाचन उपक्रम
सौ.के.एस.के.महाविद्यालयाचे इयत्ता बारावी परीक्षेत घवघवीत यश
श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ ​​काकू कला विज्ञान आणि वाणिज्य  महाविद्यालय, बीड: प्रवेश 2026, कट ऑफ, अभ्यासक्रम, फी, प्लेसमेंट, रँकिंग

बीड : येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा 21वा नाट्य महोत्सव दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन बीड नाट्य परिषदेच्या अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक डॉ. व्हि.टी. देशमाने तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी दिली आहे. हा नाट्य महोत्सव सौ. के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार असून यामध्ये दोन एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. यामध्ये डॉ. असलम युनूस लिखित व सागर धन्वे दिग्दर्शित आज काय जळतंय तसेच अभिषेक दिनकर लिखित व सागर राठोड दिग्दर्शित चेडा या एकांकिकांचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाला यावर्षी 28 वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर 21वा नाट्य महोत्सव साजरा केला जात आहे. यापूर्वी या विभागाने 20 यशस्वी नाट्य महोत्सवांमधून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर आधारित नाटके व एकांकिका सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. या नाट्य महोत्सवास उपस्थित राहून विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन नाट्यशास्त्र विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदवीधर विभाग प्रमुख डॉ. एस.एस. खान, उपप्राचार्य नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ. दुष्यंता रामटेके, प्रा. विजयकुमार राख व डॉ. असलम शेख यांनी केले आहे.

COMMENTS