Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गट सांगलीत 2 जागा लढणार

मुंबई : सांगली लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र तरीही ठाकरे गटाकडून सांगलीतील दोन विधानसभेच्या जा

बुलढाण्यातील माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा राज्यातून प्रथम
देसवंडी रस्त्याचा वाद आमदार तनपुरेंच्या मध्यस्थीने निकाली
वंचितच्या पदाधिकार्‍यावरील खोटे गुन्हे मागे घ्या

मुंबई : सांगली लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र तरीही ठाकरे गटाकडून सांगलीतील दोन विधानसभेच्या जागा लढण्याचा पवित्रा घेला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी रविवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट सांगलीमधून दोन जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी राऊतांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलतांना चंद्रहार पाटील म्हणाले, कोल्हापूरात जाऊन माझ्या कुस्तीतील गुरूंची भेट घेणार आहे. तसेच राजकीय भाष्य करताना ते म्हणाले, कोणत्याही मैदानात गेलो तरी काम प्रामाणिकपणे काम केल्यास यश हे नक्कीच मिळते. सांगलीमधून शिवसेना ठाकरे गट दोन जागा लढवणार आहे. मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढणार असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटील यांनी सांगलीमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा विशाल पाटलांसमोर दारूण पराभव झाला होता. संजय पाटील यांच्यासह तीन पाटलांच्या लढतीत ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले होते.

COMMENTS