Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देसवंडी रस्त्याचा वाद आमदार तनपुरेंच्या मध्यस्थीने निकाली

राहुरी/प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षांपासून देसवंडी येथील पवार वस्ती ते गिते वस्तीचा रस्ता वादात अडकला होता. या वादापायी रस्त्याची अतिशय दुरवस्था

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
कोपरगाव आरोग्य अधिकाऱ्यांचा रेमडेसिवीरचा दावा खोटा की, खरा ? ; हॉस्पिटलच्या नावे ३६ रेमडेसिवीर गेले कुठे?
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन : अजित जगताप

राहुरी/प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षांपासून देसवंडी येथील पवार वस्ती ते गिते वस्तीचा रस्ता वादात अडकला होता. या वादापायी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. 100 वर्षांपासून असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अलीकडच्या काळात हद्दीच्या वादावरून अतिक्रमण झाल्याने शाळेतील मुले, शेतकरी, दूधउत्पादक, महिला यांची मोठी गैरसोय होत होती, अखेर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मध्यस्थीने हा वाद निकाली निघाला आहे.
यावादावर तोडगा काढण्याची मागणी डॉ. प्रकाश पवार व ग्रामपंचायत सदस्या मंगलताई पवार यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली. त्या मागणीनुसार आमदार तनपुरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्यासाठी दोन्ही बाजूच्या लोकांकडून वारंवार वाद होत असत म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून त्यातून मार्ग काढल्याने अनेक वर्षांचा वाद मिटला. आमदार तनपुरे यांनी या रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला, तसेच या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही दोन्ही गट व ग्रामस्थांचे उपस्थित आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते झाले. याकामासाठी शिवसेना संपर्कप्रमुख पै रावसाहेब खेवरे व उत्तमराव पवार यांनी देखील पाठपुरावा केला. उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रकाश पवार, अ‍ॅड मोहन पवार दत्तात्रय पवार, सुभाष पवार, युवराज पवार, दामोधर पवार, अशोक गीते, बापू गीते, काकासाहेब शिरसाठ, दत्तात्रय कोकाटे, नामदेव शिरसाठ, अशोक भिसे, नानासाहेब शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, भास्कर पवार, सुदाम पवार, रवी पवार, गणेश पवार, अनिल पवार, सुनील पवार, संतोष जाधव, बाबा बोर्डे, दौलत गायकवाड आदींसह बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दोन्ही पवार व शिरसाठ परिवाराच्या वतीने आ. तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS