Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योग विद्येत प्रिया चव्हाण राज्यात चौथी; सातारा जिल्ह्यात द्वितीय

वाई : येथे जिल्हा योग संघाच्या वतीने प्रिया चव्हाण यांचा सत्कार करताना मान्यवर. पाचगणी / वार्ताहर : पांचगणी येथील आरोग्य केंद्रात योग प्रशिक्षणार्

न्यूझीलंडला ‘गिल’ वादळाचा तडाखा
सुमितचा भालाफेकमध्ये विश्‍वविक्रमासह सुवर्णवेध
शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल

पाचगणी / वार्ताहर : पांचगणी येथील आरोग्य केंद्रात योग प्रशिक्षणार्थी असलेल्या प्रिया चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या योग परीक्षेत राज्य स्तरावर चौथा क्रमांक पटकावला असून त्यांची पुढील राष्ट्रीय योग स्पर्धेकरिता निवड झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. मूळ विरमाडे, ता. वाई येथील असलेल्या प्रिया चव्हाण यांना शालेय जीवनापासून योगाची आवड होती. त्यानंतर त्यांनी योगाचे प्रशिक्षण सातारा येथील योगविद्या धाम योग पंडित राष्ट्रीय योगगुरू कोच शिंदे दांपत्य यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे धडे घेतले आहेत.
आता त्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा विजयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. घरातील त्यांचे पती आणि सर्व कुटुंबीय यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्यामुळे त्यानी हे यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पांचगणी रोटरी क्लब, आरोग्य केंद्रातील सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.
प्रिया चव्हाण यांनी कोणत्याही स्पर्धेत सहभागी नाव कमवावे हे त्याचे वडील अशोक निकम यांनी इच्छा होती. आज त्यांच्या पश्‍चात प्रिया चव्हाण यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

COMMENTS