Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितच्या पदाधिकार्‍यावरील खोटे गुन्हे मागे घ्या

कोपरगावमध्ये तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणूकी दरम्यान झालेल्या दंगली मध्ये सुडभावनेने वंचित बहुजन

नारायण गव्हाण खून खटल्यातील आरोपींची जामीनावर मुक्तता
मुळा-प्रवरा संचालक मंडळाला उच्च न्यायालयाची नोटीस
शरसंधान ! एसपी साहेब, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात ‘का’? l पहा LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणूकी दरम्यान झालेल्या दंगली मध्ये सुडभावनेने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्याक्ष किसनराव चव्हाण यांच्यासह इतर पदधिकार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल केले असून ते तत्काळ मागे घ्यावे या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विजय बोरुडे यांना दिले आहे. या प्रसंगी अनिल बनसोडे, राजेंद्र मोकळं, शुभम शिंदे आदीनी दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगांव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणूकी दरम्यान  छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदु मुस्लीम दंगल झाली. या दंगलीत प्रचंड माठया प्रमाणात दगडफेक होऊन छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील व शहरातील व्यापा-याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. या दंगलीमुळे शहरात प्रंचड दहशतीचे व सामाजिक दुषित वातावरण तयार झाले असुन ज्यांनी ही दंगल घडवुन आणली व जे समाजकंठक त्या दंगलीत प्रत्यक्ष सहभागी होऊन् वातावरण खराब करु पाहत आहे त्या समाजकटंकावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो. परंतु या दंगलीच्या गुन्हामागे सुडभावनेने वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्याक्ष किसनराव चव्हाण, शेवगांव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख आणि इतर कार्यकर्ते यांच्या वर  खोटे गुन्हे दाखल करुन आरोपी केले आहे. शेवगांव पोलीसांनी सूडबुध्दी ने प्रस्तापित सत्ताधा-यांच्या कट कारस्थान रचित सकारी कामकाजात अडथळा निर्मामा करणे, हिदु-मुस्लिम दंगल घडविण्यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहे तरी ते दाखल खोटे गुन्हे तात्काळ माघार घ्यावे अन्यथा मोठे अंदोलन करण्यात येईल व त्यातून काही अघटित घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशारा कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना देत दिला आहे.

COMMENTS