Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र ; 5 जूनच्या मोर्चात होणार सहभागी

मुंबई ः हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मोर्चांची घोषणा केली होती. द

सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्या वतीने परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
देगलूरातील सेतू सुविधा केंद्रे आर्थिक पिळवणुकीचे केंद्र? शासकीय दरपत्रकाला हरताळ, दोषींवर कारवाईची मागणी

मुंबई ः हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मोर्चांची घोषणा केली होती. दरम्यान, आता हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून, एकच मोर्चा काढणार आहेत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मनसेनेही एकत्र मोर्चा काढण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एकत्रच मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित छायाचित्रासह केलेल्या या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी ’’महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’’ असे म्हटले आहे. तर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढणार असल्याच्या वृत्ताला मनसेचे ने संदीप देशपांडे यांनीही दुजोरा दिला असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हा मोर्चा काढणार असून, हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा असेल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती.

COMMENTS