Homeताज्या बातम्या

अनंतनागच्या लाल चौकात दहशतवादी हल्ला; पोलिसाचा मृत्यू, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेदरम्यान दुर्घटना

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक परिसरात बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस दलातील मुख्य शिपाई आशिक हुसैन यांचा

अमेरिकेविरुद्ध इराणची युद्धपुकार; कुवेत मधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रांचा मारा
सुनील आठवले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी निवड; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात हेड कॉन्स्टेबलला  वीरमरण

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक परिसरात बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस दलातील मुख्य शिपाई आशिक हुसैन यांचा मृत्यू झाला. ते अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी कर्तव्यावर तैनात होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. सुरक्षा दलांनी तातडीने प्रत्युत्तर दिल्यानंतर काही काळ दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू राहिली. या गोळीबारात मुख्य शिपाई आशिक हुसैन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलीस, सैन्य आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण लाल चौक तसेच लगतच्या परिसराला वेढा घातला आहे. अतिरिक्त सुरक्षा पथके घटनास्थळी दाखल करण्यात आली असून व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हा परिसर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठांपैकी एक असल्याने घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाकाबंदी करून शोधमोहीम तीव्र

हल्ल्यानंतर परिसरातील सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून ये-जा करणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची कसून तपासणी सुरू आहे. हल्ल्यात किती दहशतवादी सहभागी होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले आणि ते परिसरातच लपून बसले आहेत का, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.

COMMENTS