Homeताज्या बातम्यादेश

टीम इंडियाचा 41 धावांनी शानदार विजय

थेट फायनलमध्ये मारली धडक

कोलंबो प्रतिनिधी - रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेवर शानदार विजय मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यासह आशिया कप

भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले
चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन
सानिया मिर्झाचा मोठा निर्णय

कोलंबो प्रतिनिधी – रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेवर शानदार विजय मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यासह आशिया कपच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. टीम इंडियाने आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात श्रीलंकेवर 41 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 213 धावांचा शानदार बचाव करत श्रीलंकेचा विजयरथ रोखला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी लंकेचा 41.3 ओव्हरमध्येच 172 धावांवर बाजार उठवला. यासह टीम इंडियाची ही आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचण्याची दहावी वेळ ठरली आहे. तसेच टीम इंडियाने श्रीलंकेचा विजयीरथ यशस्वीपणे रोखला. याआधी लंकेने सलग 13 वनडे सामने जिंकले होते

श्रीलंकेकडून दुनिथ वेललागे याने नाबाद सर्वाधिक 42 धावा केल्या. धनंजया डी सील्वा याने 41 धावांचं योगदान दिल. चरिथा असलंका याने 22, सदीरा समाराविक्रमा 17 आणि कुसल मेंडीस याने 15 धावा केल्या. मथीशा पथीराना आला तसाच झिरोवर गेला. तर उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत कुलदीपला चांगली साथ दिली. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्या खात्यात 1-1 विकेट गेली..

COMMENTS