Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरवणूकीच्या खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रमाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई प्रतिनिधी - सामाजिक समतेचे पुरस्कर्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आयोजित मिरणवणुक व बॅन्ड पथकाच्या खर्चाला फाटा देऊ

समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट
आरटीईसाठी शाळांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ
सिल्व्हर ओकवरील हल्ला पूर्व नियोजित कट : ना. जयंत पाटील

अंबाजोगाई प्रतिनिधी – सामाजिक समतेचे पुरस्कर्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आयोजित मिरणवणुक व बॅन्ड पथकाच्या खर्चाला फाटा देऊन येथील युवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. शनिवारी येथील रविवार पेठेतील वीरशैव लिंगायत मठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी महात्मा बसवेश्वच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . त्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याची माहिती दिली . वीरशैव महिला भजनी मंडळाने सामुहिक महाआरती केली . शंभूलिंग शिवाचार्य महाराज आणि इतर मान्यवरांनी मठात वृक्षारोपन केले . महात्मा बसवेश्वर चौकातील फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोशाळेत जाऊन चारा वाटप करण्यात आले . जनावरांना पाण्यासाठी सिमेंटचा हौद देण्यात आला . येत्या सोमवार प्रसिध किर्तनकार शिवलीला पाटील यांचे किर्तन आणि भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रसंगी शंभुलिंग शिवाचार्य, बाबा महाराज, विनोद पोखरकर , प्रा . राजमाने , डॉ . संतोष कडगे, शैलेश स्वामी , गणेश काळे, मनोज बरदाळे, प्रसाद कोठाळे , शिवकुमार निर्मळे , सरपंच बाळासाहेब सोनवणे, सचिन रुद्राक्ष, महेश उरगुंडे, राजेश खंदारे, एस. आर बुरांडे, बाळासाहेब खंदारे , जगदीश ढेले, नागेश औताडे, अनिल व्यवहारे, अमोल व्यवहारे, योगेश मोदी, संगाप्पा कोठाळे, शुभम वारद , सुनिल हामने, राहुल यादव, वेदांत शेटे व इतर नागरिक उपास्थित होते .

COMMENTS