Homeताज्या बातम्या

सानिया मिर्झाचा मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घ

देशाला वर्ल्ड चॅम्पियन केलं अन् मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी
जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन
मनू, गुकेशसह 4 जणांना ’खेलरत्न’ तर स्वप्नील कुसाळे ’अर्जुन पुरस्कार’ने सन्मानित

ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. मिर्झा आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हेनियन संघाकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे. पराभवानंतर, सानिया मिर्झाने घोषित केले की २०२२ हा तिचा दौर्‍यावरील शेवटचा सीझन असेल आणि तिला तो खरोखर पूर्ण करायचा आहे. “हा माझा शेवटचा सीझन असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण सीझन खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेन की नाही माहित नाही”, असं सानिया मिर्झाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

COMMENTS