Homeताज्या बातम्याक्रीडा

महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली- बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयन

दिल्ली-कोलकाता सामना पाहण्यासाठी पोहचले ऍपलचे सीईओ टीम कुक
‘अ बिलियन फिल्म्स फॉर अ बिलियन फॅन्स’ कॅम्पेन 
महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली- बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. तर स्मृती मनधाना ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच श्रेयांका पाटील आणि विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया या दोघांचाही समावेश मुख्य संघात करण्यात आला आहे. मात्र या दोघी दुखापतग्रस्त आहेत. दोघीही दुखापतीतून सावरत आहेत. मुख्य स्पर्धेआधी या दोघी पूर्णपणे फीट झाल्या तरच यांना वर्ल्ड कपसाठी खेळता येईल, अन्यथा दोघांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. त्यामुळे या दोघींसमोर स्वत:ला फिट करण्याचं आव्हान असणार आहे.

COMMENTS