Homeताज्या बातम्याविदेश

बांग्लादेशात उद्या तारिक रहमान यांचा शपथविधी

भारतासह 13 देशांना शपथविधीचे खास निमत्रंणढाका ः बांग्लादेशातील सत्तांतरानंतर नव्या सरकारचा शपथविधी समारंभ उद्या 17 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून

बांगलादेशात 12 फेब्रुवारीला होणार मतदान
भारतासोबत संबंध सुधारण्याचे बीएनपीचे संकेत
बांगलादेशात रोहिंग्यांच्या दोन गटातील चकमकीत सहा जण ठार

भारतासह 13 देशांना शपथविधीचे खास निमत्रंण
ढाका ः बांग्लादेशातील सत्तांतरानंतर नव्या सरकारचा शपथविधी समारंभ उद्या 17 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार्‍या सरकारचा हा पहिला औपचारिक सोहळा ठरणार आहे. अंतरिम प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून राजधानी ढाका येथील संसद भवनाच्या दक्षिण प्रांगणात शपथविधी पार पडणार आहे.
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी या सोहळ्यासाठी भारतासह 13 देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवले आहे. दक्षिण आशिया आणि पश्‍चिम आशियातील महत्त्वाच्या देशांचा यात समावेश आहे. निमंत्रित देशांमध्ये भारत, चीन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भुटान यांचा समावेश आहे. या निमंत्रणातून बांग्लादेशने प्रादेशिक सहकार्याला प्राधान्य देण्याचा संदेश दिल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. भारताकडून कोण उपस्थित राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीची शक्यता कमी मानली जात आहे, कारण त्याच कालावधीत इमॅन्युएल मॅक्रों यांच्या भारत भेटीचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारताकडून परराष्ट्र किंवा अन्य वरिष्ठ मंत्री प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने स्पष्ट बहुमत मिळवले. 300 सदस्यीय संसदेत सरकार स्थापनेसाठी आवश्यक 151 पेक्षा अधिक जागा पक्षाने जिंकल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेचा अंत झाल्यानंतर उसळलेल्या जनआंदोलनानंतरची ही पहिली मोठी निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले होते.

COMMENTS