Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये ई-बसच्या आगमनाबाबत ‘तारीख पे तारीख’

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : शहर बसच्या ताफ्यात 35 ई-बसचा समावेश करण्यासाठी स्मार्ट सिटीने हैदराबाद येथील कंपनीसोबत करार केला आहे. वर्षभरापासू

बालाजीला केस अर्पण करणे पडले महागात, नोकरी गेली
अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : शहर बसच्या ताफ्यात 35 ई-बसचा समावेश करण्यासाठी स्मार्ट सिटीने हैदराबाद येथील कंपनीसोबत करार केला आहे. वर्षभरापासून या ई-बसची प्रतीक्षा आहे. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात 15 ई-बस शहरात दाखल होतील, असे सांगण्यात आले होते. पण, अद्याप चार्जिंगची सोय झाली नसल्याने या बस थेट एप्रिल 2024 मध्येच येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. पण, ही माहिती एप्रिल फुल ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानातून पहिला मोठा प्रकल्प शहर बसचा राबविण्यात आला. 100 बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. दरम्यान, शासनाने शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांचा वापर वाढविण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केल्या होत्या.

शासनाच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत 35 ई-शहर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वातानुकूलित शहरातील पर्यटन मार्गासह ज्या मार्गावर अधिक गर्दी असते, तिथे चालविल्या जाणार आहेत. स्मार्ट सिटी या बस करारावर घेणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील कंपनीसोबत करार करण्यात आला.

कंपनीने पहिल्या टप्प्यात 15 तर दुसर्‍या टप्प्यात 20 बस देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार बसची बांधणी सुरू करण्यात आली. पण, शहरात ई-बसच्या चार्जिंगची सुविधा अद्याप नाही. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत जाधववाडी भागात स्मार्ट बस डेपोचे काम सुरू आहे. याठिकाणी सुमारे अडीचशे बस थांबण्याची सोय आहे. त्यातच ई-बसच्या चार्जिंगची सोय असेल. ई-बस लवकरात लवकर आणता येईल. यासाठी चार्जिंगची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जात आहे. बस डेपोच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर असले तरी पण परिसरात काळी माती असून, ही माती खोदून त्याठिकाणी काँक्रिटीकरणाच्या कामाला वेळ लागणार आहे. त्यामुळे ई-बसचे आगमन लांबणीवर पडणार आहे. एप्रिलपर्यंत शहरात बस येतील, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या शंभर बसची तयारी – 35 ई-बस कंत्राटी पध्दतीने चालविल्या जाणार असल्या तरी पीएम ई-बस योजनेतून 100 बस देण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या बसच्या डेपोसाठी महापालिका शासनाकडे वाळूज येथील यापूर्वी एसटी महामंडळाला दिली जाणारी जागा मागणार आहे. जागा मिळाल्यानंतर शंभर बससाठी डेपो तयार केला जाणार आहे.

COMMENTS