Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

क्रांती चौकात आंदोलन करत कार्यकर्त्यांची मागणी

छ.संभाजीनगर ः महाराष्ट्रातील कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी यासाठी छत्रपती संभाजी नगर क

मंत्री सत्तारांविरोधात 5 फौजदारी तक्रारी दाखल
कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडे तक्रार
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage

छ.संभाजीनगर ः महाराष्ट्रातील कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी यासाठी छत्रपती संभाजी नगर क्रांती चौक येथे मंगळवारी सिल्लोड तालुक्यातील विविध तक्रारदार, अन्यायग्रस्त, पिडीत आणि त्रस्त नागरिकांनी आंदोलन केले.
शिंदे गटातील आमदार कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखाँ पठाण, कृष्णा कडूबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जीवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, कमलेश गोविंदराम कटारिया, विष्णू गंगाराम काटकर इत्यादी जवळपास 60 ते 70 लोकांनी अब्दुल सत्तार यांच्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला वाचा फोडत आज तीव्र आंदोलन केले. दरम्यानछत्रपती संभाजीनगरबीमध्ये कृषीमंत्री सत्तार यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांनी प्रतिकिया दिली आहे. अब्दुल सत्तार मंत्री झाल्यापासून त्यांनी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. गोरगरीब यांच्या जमिनी हडपणे, वाळू तस्करी करणे, जमीन न दिल्यास बळजबरीने जमीन हडपण्याचे काम सत्तार यांनी केला असल्याचा आरोप यावळी करण्यात आला. तसेच राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा कोणी मंत्री असेल तर ते अब्दुल सत्तार आहेत असा आरोप देखील आंदोलकांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आज कृषिमंत्री सत्तार यांच्याविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अंगावरील शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर अब्दुल सत्तार यांचे करायचे काय खाली मुंडके वरती पाय, राजीनामा द्या राजीनामा अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या.

COMMENTS