Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

पुढील चार दिवस राहणार पावसाचा जोर

मुंबई ः राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण असतांना दुसरीकडे राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेे. विदर्भात

पेठ तालुक्यातही अवकाळी पाऊसाचा फटका 
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट
राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचे संकट !

मुंबई ः राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण असतांना दुसरीकडे राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेे. विदर्भातील नागपुरमध्ये गुरूवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्यामुळे उष्णतेच्या लाटेने हैराण झालेले नागपुरकर या पावसाने चांगलेच सुखावले होते.  गुरूवारी सुमारे दीड तास सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला चांगलेच झोडपले. यामुळे उन्हापासून दिलासा मिळाला.
प्रादेशिक हवामान खात्याने गुरूवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. सकाळी पावणेदहाच्या सुमारास चांगलेच अंधारून आले. पाठोपाठ मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुमारे दीड तास पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती, नागपूर, वाशीम तर मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही आठवड्यापासून उष्णतेची लाट कायम आहे. यात सतत वाढ होत आहे. तर दुसरीकडे राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे संकट देखील कायम आहे. अशात नागपूर जिल्ह्यात उद्यापासून म्हणजेच 10 मेपासून पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस होऊ शकतो. कोकणामध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट जाणवत आहे. ही लाट आणखी पुढील चार दिवस राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामध्ये आता पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात 12 मेपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वार्‍यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

12 मेपर्यंत पावसाचा अंदाज – हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. विदर्भासह मराठवाड्यात 12 मेपर्यंत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर, आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

COMMENTS