Homeताज्या बातम्या

लिफ्टमध्ये अडकल्यानं संतापला तरुण

बाहेर पडताच सुरक्षारक्षकाला मारहाण

गुरुग्राम प्रतिनिधी - गुरुग्राम मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एका सोसायटीतील व्यक्ती तेथील सुरक्षारक्षकाला कानाखाली मारताना दि

सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून
प्रियकराची हत्या; मृतदेह ड्रममध्ये टाकून फेकला नाल्यात
पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार

गुरुग्राम प्रतिनिधी – गुरुग्राम मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एका सोसायटीतील व्यक्ती तेथील सुरक्षारक्षकाला कानाखाली मारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरूग्राम येथील निर्वाणा कंट्री सोसायटीत अचानक लिफ्ट थांबली. त्यामुळे त्यात एक व्यक्ती काही वेळासाठी अडकली होती. लिफ्ट सुरू झाल्यावर ग्राउंड फ्लोअर ला येऊन थांबताच त्यातील व्यक्तीने सुरक्षारक्षकाला कानाखाली मारण्यास सुरूवात केली. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव वरुण नाथ असल्याचं सांगितलं जात आहे. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर अशोक नावाचा सुरक्षारक्षक उशिराने आला म्हणून वरुणने संतापाच्या भरात त्याला मारल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही आरोपीला अटक केली आहे.

COMMENTS