Homeताज्या बातम्यामनोरंजन

तारक मेहता का उलटा चष्मा फेम झील मेहता अडकणार लग्न बंधनात

मुंबई प्रतिनिधी - तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेने आजवर प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःची अशी वेग

माणुसकी आणि कार्यावर ठरते श्रीमंती – पारस महाराज मुथा
राज्याच्या सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी
पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे

मुंबई प्रतिनिधी – तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेने आजवर प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करत रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या मालिकेतील लहान सोनू भिडेची भूमिका साकारणारी झील मेहता आता मोठी झाली आहे आणि लवकरच ती लग्न करणार असल्याची गुडन्यूज समोर आली आहे. दरम्यान, झीलच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. व्याही भोजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून याचे खास फोटो समोर आले आहेत झील मेहता तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेसह लग्न करणार आहे. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. अखेर बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी त्यांच्या आयुष्यातील एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. झील मेहताच्या लग्नापुर्वीच्या विधींच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. झील मेहताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नापुर्वीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी झीलने फिकट निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर आदित्यनेही झीलला मॅचिंग कपडे परिधान केले होते. दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. झील मेहतानेही तिच्या सासू -सासऱ्यांसह पोज दिली.

COMMENTS