Homeताज्या बातम्या

वजिराबादमध्ये मायलेकीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून सखोल तपास सुरू

नांदेड : नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात मायलेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाचा तपास वजिराबाद पोलीस करी

राहुरी-शनीशिंगणापूर रेल्वेसाठी जमीन मोजणीला विरोध सोनईमध्ये शेकडो शेतकरी एकवटले; भूमीअभिलेख पथक हतबल
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?
“सत्य बाहेर आले तर भूकंप होईल, अनेक मोठे लोक यात सामील आहेत”; राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावर भाजप नेते बृजभूषण सिंह यांचे खळबळजनक वक्तव्य!


नांदेड : नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात मायलेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाचा तपास वजिराबाद पोलीस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील भागात राहणार्‍या काजल विजय जाधव (वय 32) या आपल्या मुलगी विशाखा जाधव (वय 12) हिच्यासह वास्तव्यास होत्या. काजल जाधव या शहरातील यशोसाई रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. काही वर्षांपासून त्या आपल्या पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरातून कोणतीही हालचाल दिसून न आल्याने शेजार्‍यांना संशय आला. अनेकदा हाक मारूनही घरातून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजार्‍यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता काजल जाधव आणि त्यांची मुलगी विशाखा या दोघीही बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोघींनाही मृत घोषित केले. मायलेकीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काजल जाधव या परिचारिका म्हणून कार्यरत असल्याने तसेच त्या मुलीसह स्वतंत्र राहत असल्याने विविध शक्यतांच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत. घरात कोणतीही संशयास्पद बाब आढळली का, मृत्यूपूर्वी काय घडले होते, तसेच दोघींच्या मृत्यूमागे कोणते कारण असू शकते याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत असून मायलेकीच्या मृत्यूमागील नेमके कारण लवकरात लवकर समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांनंतरच या दुर्दैवी घटनेचे गूढ उलगडणार आहे.

COMMENTS