Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजुरीत मजुराचा संशयास्पद मृत्यू,

पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

अहमदनगर प्रतिनिधी - डोक्याला खोलवर जखम झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. पोलिसांनी प्राथमिक अंदाजाव

लेक-जावई असताना कोपरगावला दुजाभाव का? ; राजेश परजणे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुलेंना सवाल
जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी
Ahmednagar : अहमदनगर मधून फाईव्ह जी मोबाईल टॉवरला विरोध | LokNews24

अहमदनगर प्रतिनिधी – डोक्याला खोलवर जखम झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. पोलिसांनी प्राथमिक अंदाजावरून खुनाचा गुन्हा दाखल केला. राहाता तालुक्यातील राजुरी गावातील हनुमान मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव मधुकर पवार असे असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजुरीचे पोलिस पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती  घेतली. मृत मधुकर नारायण पवार हे राजुरी येथीलच रहिवासी आहेत. गावात त्यांचे कुणाशीही वाद नव्हते. पण, त्यांच्या डोक्याला खोलवर जखम असल्याने पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त करून त्यांचा मुलगा राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गावातील रहिवाशाचा डोक्याला खोल जखम होऊन मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.

COMMENTS