Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातुरात अभियंत्याचे घर फोडले; साडेसहा लाखांची रोकड पळविली

लातूर प्रतिनिधी - शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या अंबा हनुमान परिसरात वास्तव्याला असलेल्या एका अभियंत्याचे घर चोरट्याने फोडून तब्बल 6 लाख 65 हजा

भारतीय स्त्रीशक्तीचे जगाला विराट दर्शन : उपमुख्यमंत्री अजित पवार
सहाय्यक आयुक्त संदीप भांड यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्रदान
विष्णुपुरीत मुबलक जलसाठा; नांदेडवरील पाणीटंचाईचे संकट टळले

लातूर प्रतिनिधी – शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या अंबा हनुमान परिसरात वास्तव्याला असलेल्या एका अभियंत्याचे घर चोरट्याने फोडून तब्बल 6 लाख 65 हजारांची रोकड पळविल्याची घटना भल्या पहाटे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अनंत शिवाजीराव पाटील (वय 45) हे लातुरातील अंबाजोगाई रोडवरील अंबा हनुमान परिसरात एका शाळेसमोर वास्तव्याला आहेत. घराच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय असून, ते वरच्या मजल्यावर राहतात. दरम्यान, शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ऑफिसमधील काम आटोपून त्यांनी कार्यालय बंद केले. त्यानंतर ते वरच्या मजल्यावर येऊन झोपी गेले. पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी फिरायला घराबाहेर पडली. ते योगा करत होते. त्यांच्या शेजारी वास्तव्याला असलेले भाडेकरू अनंत पाटील यांच्या पत्नीस फोन करुन सांगितले, आमच्या दाराला कोणीतरी बाहेरून कडी लावली असून, दरवाजा निघत नाही. त्यामुळे अनंत पाटील यांनी त्यांच्या घराची कडी काढली आणि खाली कार्यालयाजवळ आले असता, त्यांच्या कार्यालयाचा दरवाजाही अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे आढळून आले. त्याचबरोबर त्या कार्यालयाच्या शेजारी वास्तव्यास असलेले त्यांचे दुसरे भाडेकरू राहुल भागवत पवार (रा. पाथरवाडी ता. रेणापूर) यांचे बंद असलेल्या घराचाही कडीकोंडा तोडल्याचे आढळून आले.  घटनेची माहिती त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. राहुल पवार यांच्या घराची पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले. मात्र, घरातून काहीच चोरीला गेलेले नव्हते. अनंत पाटील यांच्या कार्यालयाची पाहणी केली असता, ड्राव्हरमध्ये ठेवलेली 6 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली होती. तसेच, कॉम्प्युटरचा सीपीयूही चोरट्यांनी पळविला. याबाबत अनंत शिवाजीराव पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS