Homeमहाराष्ट्रबीड

भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कारवाईमुळे इतर कार्यालयातील लाचखोरांचे धाबे दणाणलेकेज । प्रतिनिधीकेज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकर्‍यांकडून लाच मागणार्‍या भूमी अभिलेख कार्या

शेजारणीला ‘आई’ म्हटल्याने मुलीला मारहाण
श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारवर गोळीबार
डॉक्टरची दीड कोटींची फसवणूक

कारवाईमुळे इतर कार्यालयातील लाचखोरांचे धाबे दणाणले
केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकर्‍यांकडून लाच मागणार्‍या भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक माणिक अण्णासाहेब वाघमारे यास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील इतर शासकीय कार्यालयांतील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोरगाव बु. येथील शेतकरी महेश फकीरा गव्हाणे व इतर शेतकर्‍यांनी स.नं. 85 मधील जमिनीची मोजणी करून हद्दखुणा कायम करण्यासाठी केज येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी भूमापक माणिक वाघमारे यांनी शेतात जाऊन मोजणी केली. मोजणीनंतर चहाच्या हॉटेलवर चर्चा सुरू असताना वाघमारे यांनी संबंधित शेतकर्‍यांना तुमच्या सातबार्‍यावर वाढीव क्षेत्र असून निजामकालीन टिपण कमी आहे, त्यामुळे क्षेत्र कमी होऊ शकते. मात्र, जर 30 हजार रुपये दिले तर क्षेत्र कमी न करता फाईल निकाली काढतो, अशी मागणी केली. यावेळी शेतकर्‍यांच्या भीतीचा फायदा घेत महेश गव्हाणे यांच्याकडून 5 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर वेळोवेळी उर्वरित 25 हजार रुपये आणण्याचा तगादा लावण्यात येत होता. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने महेश गव्हाणे यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी जालना येथील अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी सुमारे 1.30 वाजता केज येथील तहसील कार्यालयासमोरील चहाच्या हॉटेलात 25 हजारांपैकी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माणिक वाघमारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 714, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर, पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे करीत आहेत.

COMMENTS