Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगतचा रस्ता खुला करा ः स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः नवरात्रोत्सव जवळ येऊन ठेपला असून, भाविक-भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव शहरानजीक राष्ट्रसंत सदगुरू

पुणतांब्यातील 17 कोटी रूपयांच्या पाणी योजनेतील त्रुटी दूर कराव्यात
शेतकर्‍यांनी तातडीने ई-पीक पाहणी करून घ्या – स्नेहलता कोल्हे
स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत

कोपरगाव प्रतिनिधी ः नवरात्रोत्सव जवळ येऊन ठेपला असून, भाविक-भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव शहरानजीक राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर व जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगत नव्याने बांधण्यात आलेला अंडर पास (भुयारी मार्ग) नगरपालिका प्रशासनाने नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकाकडे केली आहे.
‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहर व तालुक्याला ऐतिहासिक, धार्मिक व पौराणिक वारसा लाभला आहे. कोपरगाव येथे नगर-मनमाड महामार्गावर शिर्डीच्या श्री साईबाबांचे तपोभूमी मंदिर, बेट भागात गोदावरी नदीकाठी जगातील एकमेव असे दैत्यगुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर, संजीवनी पार, राष्ट्रसंत सदगुरू श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, श्री काशीविश्‍वनाथ मंदिर, श्री जुनी गंगा जगदंबा देवी मंदिर, कोकमठाण परिसरात श्री लक्ष्मीआई माता मंदिर, संत रामदासी महाराज मंदिर, भगवान श्री विष्णूचे हेमाडपंथी मंदिर, श्री शृंगऋषी मंदिर, विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक ध्यानपीठ अशी अनेक प्राचीन मंदिरे व धार्मिक स्थळे आहेत. धार्मिकदृष्ट्या त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोपरगाव शहरानजीक बेट भागात असलेल्या श्री शुक्राचार्य महाराज मंदिर, राष्ट्रसंत सदगुरू श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, श्री काशीविश्‍वनाथ मंदिर, श्री जुनी गंगा जगदंबा देवी मंदिर व इतर धार्मिक ठिकाणी कोपरगाव शहर व तालुक्यासह दूरवरून असंख्य भाविक-भक्त दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी महाशिवरात्र, नवरात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, श्री काशीविश्‍वनाथ मंदिर व श्री जुनी गंगा जगदंबा देवी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या काळात येथे भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नगर-मनमाड महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे महामार्गावरून पायी तसेच वाहनांवरून ये-जा करणे भाविक-भक्त व नागरिकांना धोकादायक ठरते. या महामार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कोपरगाव शहर, बेट व परिसरातील नागरिकांना व भाविक-भक्तांना राष्ट्रसंत सदगुरू श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, श्री काशीविश्‍वनाथ मंदिर व श्री जुनी गंगा जगदंबा देवी मंदिर या ठिकाणी सुलभरीत्या ये-जा करण्यासाठी या धार्मिक स्थळांजवळ नगर-मनमाड महामार्गावर नव्याने अंडर पास बांधण्यात आला आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरासमोर नवरात्रोत्सव काळात नऊ दिवस मोठ्या प्रमाणात भाविक घटी बसतात. तसेच या अंडर पासच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडुपे वाढलेली असून, भाविकांना व नागरिकांना ये-जा करताना त्याचा त्रास होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने ही वाढलेली काटेरी झाडे-झुडुपे त्वरित तोडून सुलभ वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करावी, अशी सूचना स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS