Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावे, असे सहकार व पणनमंत्

सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त
तासगांव राजापुर राज्य मार्गावर पावलेवाडीत वाहनांसह वाहनधारकांची कोंडी; ठेकेदारांचे कामाचे नियोजन नसल्याने वाहन धारकांना नाहक त्रास

मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावे, असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, दूरदृष्य प्रणालीद्वारे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, ऊस तोडणी आणि वाहतूक यांचा दर तीन वर्षाच्या सरासरीवर अवलंबून होते. ते आता दोन वर्षाच्या सरासरीवर करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
जोपर्यंत एफआरपीची रक्कम दिली जाणार नाही तोपर्यंत कारखाना सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. याचा अनुकुल परिणाम ऊस उत्पादकांची थकीत देणी मिळण्यावर होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही कारखाने एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना देण्याच्या तयारीत आहेत, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

COMMENTS