Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे

लोणंद / प्रतिनिधी : शेतकर्‍यांची अवहेलना करू नका. शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा. राज्यात दुष्काळ पडला तर महाराज अधिकार्‍यांना पाठवत. दु

कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले
किल्ले अजिंक्यतारा येथे शाहु महाराज राज्यभिषेक दिन साजरा

लोणंद / प्रतिनिधी : शेतकर्‍यांची अवहेलना करू नका. शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा. राज्यात दुष्काळ पडला तर महाराज अधिकार्‍यांना पाठवत. दुष्काळामुळे ज्यांची बैल जोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या. राज्यात गरिबांना धान्य नसेल तर धान्य द्या. आपल्या तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा लावू नका. फक्त मुद्दलच घ्यावी, असे महाराज सांगायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर फक्त शुन्य टक्केहोता. शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून शिवरायांच्या काळात शेतकर्‍यांनी कधीही आत्महत्या केल्या नाहीत, असे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
ते पाडेगाव (नेवसेवस्ती), ता. फलटण येथे पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. महापुरुष जयंती महोत्सव सप्ताह-2022 या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संजय जाधव होते.
श्रीमंत कोकाटे म्हणाले, शिवाजी महाराजांची लढाई मोगलशाही व आदिलशाही विरुध्द होती. अफजलखान, दिलेरखान, शाहिस्तेखान विरुध्द होती. ती लढाई मुस्लिमांच्या विरोधात कधी नव्हती. महाराजांच्या सैन्यात अनेक सैनिक होते. त्या काळातील लढाई ही राजकीय लढाई होती. ते धर्म युध्द नव्हते. ती हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. उलट महाराजांच्या सैन्यात महत्वाच्या पदावर देखील मुस्लिम होते. शिवरायांची तलवार ही कोणत्या जाती-धर्मा विरुध्द नव्हती. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. ते बुध्दीप्रामाण्यवादी होते. शिवाजी महाराजांनी कधी ही मुहूर्त आणि पंचांग पाहिले नाही. त्यांच्या लढाई अमावस्येच्या रात्री होत्या. असेही कोकाटे यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS