माहीमचा किल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहीमचा किल्ला

केळवे बीच पासून साधारण ४ किमी अंतरावर माहीम गाव आहे. या गावातच महिकावती देवीचे मंदीर आहे. यावरुन या गावाला माहीम नाव पडले. या प्रचिन गावाला लागून तित

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक होणार ?
कोरोना काळात गरीबांसाठीच्या धान्याचे नगरला होत होते पीठ ; अटक केलेल्या आठ आरोपींना पोलिस कोठडी
हिंदूत्ववाद्यांना हटवून हिंदूना सत्तेत आणा : राहुल गांधी यांचे आवाहन

केळवे बीच पासून साधारण ४ किमी अंतरावर माहीम गाव आहे. या गावातच महिकावती देवीचे मंदीर आहे. यावरुन या गावाला माहीम नाव पडले. या प्रचिन गावाला लागून तितकाच प्रचिन माहिमचा किल्ला होता. आज याचा फक्त बालेकिल्ला थोडा सुस्थितीत आहे.

किल्याचा इतिहास :

 प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात माहिमचा मुळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भिमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला.

इ.स १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडूजी करुन त्यास मजबूती आणली. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता; पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही.

इ.स १७३७ साली मराठ्यांनी माहिम किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी मराठे व पोर्तुगिज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्रपंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली 

९ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स १८१८ रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍याचा बंगला होता.

किल्याचा परिचय :

केळवे – पालघर रस्त्यावर, केळवे गावापासून साधारण ४ किमीवर माहिम आहे. माहिमच्या सरकारी दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला आहे.

माहिमच्या किल्ल्याच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहिमची खाडी आहे. प्राचिनकाळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटास भिडत असे त्यावेळी किल्ल्याचा आकार बराच मोठा होता. आता केवळ बालेकिल्ल्याचा भाग शिल्लक आहे.

पूर्वाभिमूख प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्याबाजूस उध्वस्त वास्तूचे अवशेष असून, उजव्या बाजूस तटामध्ये एक खोली आहे. प्रवेशद्वारासमोर एक सुंदर जिना आहे. या जिन्याकडे जाताना उजव्या हाताला एक कोरडी विहिर आहे. जिन्यावर चढून गेल्यावर आपण फांजीवर पोहोचतो. त्यावरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते.जिन्याच्या टोकाला दूसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्यांचा उपयोग टेहाळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे. 

लेख : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण ,

संपर्क : 9011890279

COMMENTS