Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद; व्यावसायिक महिलेवरील हल्ल्याचा निषेध

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले उद्यान परिसरात एका महिला व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २४ मार्च) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येत श्रीगोंदा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान पोलिस प्रशासनाला जाब विचारत “आरोपींवर नेमकी काय कारवाई होणार?”, “शहरात वाढत्या खोट्या गुन्ह्यांवर नियंत्रण कसे आणणार?” अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. संबंधित महिलेवर एका विशिष्ट समाजातील काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मोर्चात नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनुभुळे, गटनेत्या मीरा शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील बहुतांश व्यापारी आस्थापनांनी बंदला प्रतिसाद देत व्यवहार ठप्प ठेवले. दरम्यान, अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासाठी अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या वसुली मोहिमेमुळे तातडीने पुरेसा पोलीस फोर्स उपलब्ध होणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले की, फिर्यादी पूनम दिनेश शिंदे यांच्या तक्रारीत चोरीचा उल्लेख नसून, पूरक जबाब दिल्यानंतर संबंधित कलमे वाढवून कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, नागरिकांनी कोणतीही घटना घडल्यास त्वरित तक्रार नोंदवावी आणि साक्षीदार म्हणून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी सांगितले की, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर संबंधित ठिकाणावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाईल. तसेच, भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे श्रीगोंदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले उद्यान परिसरात एका महिला व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २४ मार्च) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

या प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येत श्रीगोंदा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान पोलिस प्रशासनाला जाब विचारत “आरोपींवर नेमकी काय कारवाई होणार?”, “शहरात वाढत्या खोट्या गुन्ह्यांवर नियंत्रण कसे आणणार?” अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. संबंधित महिलेवर एका विशिष्ट समाजातील काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चात नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनुभुळे, गटनेत्या मीरा शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील बहुतांश व्यापारी आस्थापनांनी बंदला प्रतिसाद देत व्यवहार ठप्प ठेवले.

दरम्यान, अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासाठी अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या वसुली मोहिमेमुळे तातडीने पुरेसा पोलीस फोर्स उपलब्ध होणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले की, फिर्यादी पूनम दिनेश शिंदे यांच्या तक्रारीत चोरीचा उल्लेख नसून, पूरक जबाब दिल्यानंतर संबंधित कलमे वाढवून कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, नागरिकांनी कोणतीही घटना घडल्यास त्वरित तक्रार नोंदवावी आणि साक्षीदार म्हणून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी सांगितले की, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर संबंधित ठिकाणावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाईल. तसेच, भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे श्रीगोंदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS