Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहरातील ओढे-नाले घेणार मोकळा श्‍वास

नगररचना विभागाला उशीरा का होईना आली जाग

exclusive stamp. exclusive round grunge sign. label अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरासह उपनगर परिसरातील 41 ओढे आणि नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद झा

सचिव भांगेंना पैश्यापुढे नातेवाईकही दिसेना
सचिव सुमंत भांगेचा एक हजार कोटींचा भोजनठेका घोटाळा ?
सचिव भांगे यांचा छ. संभाजीनगरचा दौरा गोपनीय का ?
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरासह उपनगर परिसरातील 41 ओढे आणि नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले होते. यासंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून देनिक लोकमंथनसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता, अखेर यानंतर मनपा प्रशासनासह नगर रचना विभागाला उशीरा का होईना जाग आली असून, त्यांनी नैसर्गिक प्रवाह खुले करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
शहरातील ओढे-नाल्यावरील अडथळे काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, महानगरपालिकेने त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महानगरपालिकेने इतर शासकीय विभागाशी समन्वय करुन तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आलेली आलेली आहे. या कार्यवाहीनुसार अहमदनगर मनपाने जेसीबी, पोकलेन मशीनच्या सहाय्याने कामकाज सुरु केलेले असून या अंतर्गत येत्या 8 दिवसात सिनानदी, कल्याण नदी पुल ते काटवन खंडोबा पुल ते लोखंडी पुल, जुने आरटीओ ऑफीसजवळ जलालशहा कब्रस्थान-देशमुख वाडी, पोलिस हेडकॉरर्टर, गुलमोहर रोड, मंगल हौसींग सोसायटी, कुटधाम रोड, रासने नगर, कैलास हौसींग सोसायटी, नगर मनमाड रोड या ठिकाणचे कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आलेले असल्याचे महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने कळवले आहे.

कार्यवाही निरपेक्षपणे होणार का ? – अहमदनगर शहरासह उपनगर परिसरातील 41 ओढे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पाइप टाकून बंद करण्यात आले आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 95 किलोमीटर लांबीच्या ओढे व नाल्यांपैकी 8.23 किलोमीटर लांबीचे प्रवाह पाइप टाकून वळविण्यात आल्याचे समोर आले होते. आता महापालिका हद्दीतील ओढे व नाल्यांच्या दोन्ही बाजूंना नऊ मीटर अंतरापर्यंत कोणतीही बांधकामे करता येणार नाहीत. या नऊ मीटर क्षेत्रात बांधकामांना परवानगी दिली जाणार नसल्याचे आयुक्त पंकज जावळे यांनी मागेच स्पष्ट केले आहे. असे असतांना, महानगरपालिका शहरातील ओढे-नाले व नदीपात्र इत्यादीवरील अडथळे हटविणार आहे. महानगरपालिकेच्या पत्रात अडथळे हा शब्द वापरल्यामुळे अतिक्रमणाचा यात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे कार्यवाहीच्या नावावर पुन्हा नगररचना विभाग सर्वसामान्यांची दिशाभूल तर करणार नाही ना असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तरीदेखील नगररचना विभागाने केलेल्या कार्यवाहीनंतरच यावर भाष्य करणे उचित होणार आहे.

COMMENTS