Homeताज्या बातम्या

फलटणचे सह दुय्यम निबंधक दीपक पवार निलंबित; दस्तनोंदणीतील अनियमिततेप्रकरणी शासनाची मोठी कारवाई

सातारा : फलटण येथील क्रमांक २ कार्यालयाचे सह दुय्यम निबंधक दीपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ

राहुरी विटंबना प्रकरण: आरोपीचा सुगावा देणाऱ्यास पोलिसांकडून ११ हजारांचे बक्षीस; शिवप्रेमींकडून मात्र सवाल
नांदेड विभागात रेल्वेची धडक विशेष तिकीट तपासणी मोहीम; १,१५५ प्रकरणांमधून ५.८६ लाखांचा महसूल वसूल
प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
Satara News: फलटणचे सह दुय्यम निबंधक दीपक पवार निलंबित | Phaltan Sub  Registrar Deepak Pawar Suspended For Registration Irregularities

सातारा : फलटण येथील क्रमांक २ कार्यालयाचे सह दुय्यम निबंधक दीपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांच्या कार्यालयातून नोंदणी झालेल्या १ हजार ५४५ दस्तांमध्ये (Property Documents) मोठ्या प्रमाणावर अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली.

महसूल व वन विभागाने ११ जून २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ‘एक जिल्हा एक नोंदणी’ व्यवस्थेंतर्गत झालेल्या दस्तनोंदणीची तपासणी व पडताळणी सध्या सुरू आहे. या तपासणी दरम्यान अनेक व्यवहारांबाबत प्राथमिक स्तरावरच गंभीर संशय निर्माण झाला आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करून ही दस्तनोंदणी झाल्याचे समोर आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील भूमी अभिलेख आणि दस्तनोंदणी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS