Homeताज्या बातम्या

राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकर जाहीर होणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार 

कल्याण प्रतिनिधी - राज्याचे  सांस्कृतिक धोरण लवकर जाहीर केले जाणार असून या धोरणामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतील तसेच या सांस्कृतिक ध

त्रिकोणी प्रदेशातील राजकीय रस्सीखेच !
परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क – पालकमंत्री विखे 
संकटातून पथदर्शी मार्ग काढण्याचा विश्‍वास : अमिताभ कांत

कल्याण प्रतिनिधी – राज्याचे  सांस्कृतिक धोरण लवकर जाहीर केले जाणार असून या धोरणामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतील तसेच या सांस्कृतिक धोरणासाठी दहा उप समित्या नियुक्त केलेले आहेत  सांस्कृतिक धोरणामध्ये नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे त्यासाठी टाईम टेबल सुद्धा ठरवला जाणार आहे. तसेच ज्या कलावंतांना राज्य सरकार पुरस्कार देत त्या कलाकारांना आता  क वरून पेशन योजना  अ वर्गाची पेन्शन योजना राज्य सरकार सुरू करणार आहे . 

 ज्या कलावंतांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो त्या कलाकारांना आता राज्य सरकार पेशन ३१५०इतकी पेशन देणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाचे  आयोजन  वाशी ,नवी मुंबई येथे  राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित  करण्यात आले होते ये  ढोलकी  तमाशा  फड  महोत्सवा बरोबरच  तमाशा तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावगावकर जीवनगौरव पुरस्काराचे  वितरण करण्यात आले. पावसाच्या वातावरणामध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्यात आला. 

यावेळी सन २०१८-१९ चा तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार  त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर व कल्पना संगमनेरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वीकारला. तर सन २०१९-२० चा पुरस्कार श्री. अतांबर शिरढोणकर यांना आणि सन २०२०-२१ चा पुरस्कार श्रीमती संध्या रमेश माने यांना यावेळी प्रदान करण्यात आला. 

COMMENTS